दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर हे 10 शेअर्स घ्या, वर्षभरात देतील दमदार परतावा!

Share
ShareSakal media

Dussehra Stock Picks: सध्या शेअर बाजार त्याच्या ऑलटाइम हायवर (All time High) आहे. सेंसेक्स आणि निफ्टी दोघेही आपल्या रेकॉर्ड स्तरावर आहेत. बाजारात ही तेजी बऱ्याचा काळापासून आहे, अनेक जणांना या संधीचा फायदा घेता आला नाही. आता भलेही वॅल्युएशन महागले असेल तरीही गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हीही ही संधी गमावली असेल तर चिंता करु नका, पुन्हा नव्याने पोर्टफोलियो तयार करायचा असल्यास दसऱ्याचा शुभ मुहुर्त आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर गुंतवणूक करुन आपला पोर्टफोलियो मजबूत करु शकता. आम्ही ट्रेड स्विफ्टचे डायरेक्टर संदीप जैन यांनी सांगितलेल्या 10 शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यात गुंतवणूक करुन तुम्ही 9 ते 12 महिन्यांमध्ये दमदार परतावा मिळवू शकता.

गुंतवणुकीसाठी 3 कटेगिरी दिल्या आहे, ज्यात जास्त जोखिम जास्त परतावा (High Risk and high return), दूसरी मॉडरेट गुंतवणुकदारांसाठी आणि तिसरी कमी जोखिम आणि भरपूर परतावा (Low Risk and high return) अशा कॅटेगरीज आहेत.

- जास्त जोखिम, जास्त परतावा (High Risk and high return)
सनफ्लॅग आयरन (Sunflag Iron)
लक्ष्य : 97 रुपये
मेटल क्षेत्रातील ही एक अतिशय चांगली कंपनी आहे. सध्या चांगल्या मूल्यांकनावर (valuation) व्यापार करत आहे. याच्या शेअर्सची किंमत 80 ते 85 रुपयांच्या दरम्यान आहे. सध्या हा स्टॉक बुक व्हॅल्यूच्या जवळच ट्रेडिंग होत आहे.

टीडी पॉवर सिस्टम (TD Power System)
लक्ष्य : 390 रुपये
ही उर्जा क्षेत्रातील भविष्य काळात वाढ होणारी चांगली कंपनी आहे. गेल्या 3 वर्षात, हिचा नफा 68 टक्के CAGR ने वाढत आहे. येत्या काही दिवसांमध्ये स्टॉक अधिक चांगली कामगिरी करू शकतो.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
लक्ष्य : 105 रुपये
पीएसयू बँक स्टॉक बँक ऑफ बडोदाच्या शेअरमध्ये अलीकडच्या काळात फारशी वाढ झालेली दिसत नाही. बँकेचे फंडामेंटल्स खूप मजबूत आहेत. सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये चांगली गती (Momentum) कायम आहे.

Share
RBI Governor | भारत आर्थिक धोरणात उदार राहणार

- मॉडरेट गुंतवणुकादारांसाठीचे शेअर्स


नेसले (Nestle)
लक्ष्य : 21750 रुपये
ही एफएमसीजी क्षेत्रातील एक मजबूत कंपनी आहे. त्यांची मॅगी आणि किटकॅट सारखी प्रसिद्ध उत्पादने आहेत. कंपनीने आपले कर्ज मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. ही सातत्यपूर्ण लाभांश (Dividend) देणारी कंपनी आहे.

एचआयएल (HIL)
लक्ष्य. : 5930 रुपये
ही कंपनी बांधकाम साहित्याची निर्मिती करते. ही सीके बिर्ला ग्रुप कंपनी आहे. सध्या याचे स्टॉक स्वस्त मूल्यांकनावर व्यवहार करत आहे. वितरण (Distribution) नेटवर्क अतिशय तगडे आहे.

हॉकिन्स कूकर (Hawkins Cooker)
लक्ष्य: 6950 रुपये
प्रेशर कुकर सेगमेंटमधील ही एक दमदार कंपनी आहे. याचे लाभांश उत्पन्न (Dividend Yield) आकर्षक आहे. कंपनीमध्ये सतत वाढ होत आहे.

Share
चीनमध्ये गूगल, फेसबूकनंतर LinkedIn पण होणार बंद!

जोखीम कमी, परतावा शानदार (Low Risk, High Return)

व्हीएसटी इंडस्ट्रीज (VST Industries)
लक्ष्य : 4130 रुपये
कंपनीचे लाभांश उत्पन्न (Dividend Yield) 3.5 टक्के आहे. आर के दमाणी सारख्या अनुभवी गुंतवणूकदाराने त्यात गुंतवणूक केली आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. पण हे शेअर्स जेव्हा खाली येतील तेव्हाच खरेदी करावे असा सल्ला दिला जातो आहे.

अक्झो नोबल इंडिया (Akzo Nobel India)
लक्ष्य : 2490 रुपये
ही एक एमएनसी पेंट कंपनी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात येणाऱ्या तेजीचा फायदा या कंपनीला मिळणार आहे. याचे लाभांश उत्पन्न (Dividend Yield) सुमारे 2.25 टक्के आहे.

एफडीसी लिमिटेड (FDC Ltd)
लक्ष्य : 410 रुपये
ही एक फार्मा क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रोल, मायक्रोडर्म सारखे लोकप्रिय ब्रँड बनवते. कंपनी ओआरएसची मोठी उत्पादक आहे. यामध्ये कमी जोखीम आहे.

- स्पेशल पिक (Special Pic)

एचडीएफसी लिमिटेड (HDFC ltd)

लक्ष्य : 3150 रुपये

आर्थिक क्षेत्रातील ही एक मजबूत कंपनी. सातत्यपूर्ण वाढीसह हा उत्कृष्ट दर्जाचा स्टॉक आहे. पुढे हाउसिंग फायनान्सचा चांगला फायदा होणार आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com