भाजप खासदारच म्हणतात, देशात अर्थव्यवस्था कळणारे नेतेच नाहीत!

भाजप खासदारच म्हणतात, देशात अर्थव्यवस्था कळणारे नेतेच नाहीत!

देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता सरकारकडे राजकीयदृष्ट्या जाणकार अर्थशास्त्रज्ञांची एक आपत्ती व्यवस्थापन टीम (crisis management team)  हवी असल्याचे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. 'रिसेट : रिगेनिंग इंडियाज इकॉनॉमिक लेगसी' या पुस्तकात त्यांनी आपले विचार मांडले आहेत. सरकारच्या आर्थिक धोरणांवर स्पष्टपणे टीका करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी ओळखले जातात.

सध्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना स्वामी म्हणतात, " आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी समग्र अर्थशास्त्राची (macroeconomics) जाण  असलेले अर्थतज्ज्ञच या स्थितीतून बाहेर काढू शकतात. मात्र, हे जाणकार आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या विचारांची गुलामी करणारे नसावेत तर मुख्यतः भारतीय अर्थव्यवस्थेशी घट्ट नाते असणारेच असावेत. या समितीत असलेल्या अर्थतज्ज्ञांना राजकीय स्थितीची जाण असावी तर राजकीय नेत्यांना अर्थव्यवस्थेची."

सरकारवर जोरदार टीका करताना स्वामी म्हणतात, " आजच्या नेतृत्वाला अर्थव्यवस्था कुठे व कसे घेऊन जायचे आहे याची जाण नसल्याचे दिसते. आणि त्यांचा बराचसा वेळ हा मीडिया मॅनेज करण्यात आणि मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यात जातो. 1947 पासून पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या वाईट अवस्थेतून जात आहे. ज्यात मुळातच संरचनात्मक त्रुटीत आहेत.

ते असेही मानतात की सरकारी उपसमितींमध्ये काम करणाऱ्या सदस्यांना गुणात्मक अर्थशास्त्राचे (quantitative economic logic) औपचारिक प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. जेणेकरून त्यांना आर्थिक संकट ओळखणे, त्यावर सर्वोत्तम उपाय योजने आणि भागधारकांना आकर्षित करणे यांसारख्या गोष्टी करता येतील.

महागाई नियंत्रणात असल्याचा आनंद नाही
एकीकडे वस्तूंच्या मागणीत घट होत असल्याने महागाईचा दर नियंत्रणात असल्याचे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र आपण या स्थितीतून लवकरच बाहेर पडू असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com