esakal | OYO चा IPO लवकरच बाजारपेठेत? ८ हजार कोटी खुले करणार
sakal

बोलून बातमी शोधा

oyo logo

OYO चा IPO लवकरच बाजारपेठेत? ८ हजार कोटी खुले करणार

sakal_logo
By
ओमकार वाबळे

झोमॅटोच्या आयपीओनंतर आता हॉटेल व्यवसायाशी निगडीत आणखी एका कंपनीने बाजारात निवेश करण्यासाठी अर्ज केला आहे. रितेश अग्रवाल यांचा अग्रगण्य हॉटेल एकत्रीकरणाचा उपक्रम म्हणजेच 'ओयो हॉटेल्स अँड होम्स' बाजारपेठेत 8,430 कोटी ($ 1.2 अब्ज) रुपये खुले करणार आहेत. त्यांनी आयपीओसाठी अर्ज केला आहे. सार्वजनिक बाजारपेठेला टॅप करण्यासाठी ओयो अनेक स्टार्टअप्समध्ये देखील गुंतवणूक करत आहे.

जुलै महिन्यात झोमॅटो कंपनीने देखील त्यांचा आयपीओ बाजात आणल्यानंतर त्याला यश मिळाले होते. बाजारपेठेतील तज्ञांनी हा आयपीओ शॉर्ट टर्म गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे सुचवले होते. त्यानंतर फ्रेशवर्क्स गेल्या महिन्यात अमेरिकेत तितकाच यशस्वी ठरला होता. Nykaa, Paytm, आणि Policybazaar या कंपन्या देखील बाजारातपेठेत लवकरच आयपीओ दाखल करण्याची अपेक्षा आहे.

सेबीकडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मध्ये ओयोच्या आयपीओ किंमत बँडचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, रॉयटर्सच्या माहितीनुसार ओयो 10 अब्ज डॉलर्स ते 12 अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन शोधत आहे. त्यानुसार IPO मध्ये 83% किंवा 7,000 कोटी रुपयांचे नवे समभाग अपेक्षित आहेत. उर्वरित 17%किंवा 1,430 कोटी रुपये विक्रीसाठी ऑफर असतील.

हॉटेल अॅग्रिगेटर या नव्या इश्यू केलेल्या शेअर्समधून मिळणारी रक्कम कर्जाची भरपाई करण्यासाठी योजना आखत आहे. तसेच उपकंपन्यांकडून काही कर्जाचे प्रीपेमेंट करण्यासाठी, अधिग्रहण करण्यासाठी आणि अन्य आवश्यक आर्थिक तरतुदींची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात आहे. यामार्फत कंपनीला बाजारपेठेत आणखी पाय घट्ट रोवता येतील.

अग्रवाल आणि कंपनीतील काही गुंतवणूकदार म्हणजेच लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स, सिकोइया कॅपिटल, चीनची राईड-हेलिंग कंपनी, ग्रीनोक्स कॅपिटल, एअरबीएनबी आणि मायक्रोसॉफ्ट या ऑफरमध्ये कोणतीही हिस्सेदारी सादर करणार नाहीत.

loading image
go to top