मोदी सरकारला मोठे यश तर पाकिस्तानला मोठा झटका!

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे

वॉशिंग्टन: जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीचे हे यश मानले जात आहे. भारताने जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला यश मिळाले असून टेरर फंडिंगवर देखरेख करणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला  ग्रे लिस्टमधून काढून काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले आहे. 

दहशवाद्यांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का मनाला जात आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था आधीच खोलात गेली आहे. आता  एफएटीएफने घेतेलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज मिळवणे अधिक अवघड होणार आहे. एफएटीएफने याआधी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. मात्र पाकिस्तान टेरर फंडिंग थांबविण्यात अपयशी ठरला आहे. शिवाय पाकिस्तान आशिया-पॅसिफिक ग्रुपचे (एपीजी) १० मानकांन पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. 

एपीजीच्या अहवालानुसार, कायदेशीर आणि आर्थिक यंत्रणेसाठी पाकिस्तान 40 पैकी 32 मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. याव्यतिरिक्त, दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वापर करण्यास अपयशी ठरला आहे. त्यात 11 पैकी 10 निकष पूर्ण करू शकला नाही. कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँकेकडे हात पसरवणाऱ्या पाकिस्तानला आता काळ्या यादीत टाकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज मिळवणे आणखी अवघड होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Placed in 'Enhanced Blacklist' by FATF