Paytm IPO | देशातील सर्वात मोठा IPO फ्लॉप! 2 दिवसांत 6,690 कोटी बुडाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

देशातील सर्वात मोठा IPO फ्लॉप! 2 दिवसांत 6,690 कोटी बुडाले

sakal_logo
By
ओमकार वाबळे

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications Ltd चे शेअर्स लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही घसरत राहिले. मात्र, मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये थोडी खरेदी झाली. आज कंपनीचा शेअर बीएसईवर 1,434 रुपयांवर व्यवहार करत आहे. 8 नोव्हेंबरला बाजारात आलेला आयपीओ 10 ला बंद झाला. मात्र, देशातील सर्वात मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार, या दोन दिवसांत पेटीएमच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे जवळपास $900 दशलक्ष (रु. 6,690 कोटी) बुडाले आहेत.

Paytm आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Paytm ने याच महिन्यात महिन्यात आपला IPO लॉन्च केला. बाजारात येण्याआधी भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असल्याचं सांगितलं जात होतं. त्याचं लिस्टिंग खूप खराब होतं. प्रचंड विक्रीच्या दबावामुळे, पेटीएमचे शेअर्स सोमवारी NSE वर 12.74 टक्क्यांनी घसरून 1,362.00 रुपयांवर बंद झाले. हे त्याच्या प्रसिद्ध केलेल्या किंमतीपेक्षा सुमारे 37 टक्क्यांनी कमी होतं.

मोबाइल पेमेंटपासून ते आर्थिक सेवा पुरवणाऱ्या पेटीएमचे शेअर्स गेल्या आठवड्यात गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. हा सुमारे 1800 कोटी रुपयांचा IPO होता, जो आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा IPO आहे. पेटीएमच्या आयपीओची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये जपानी गुंतवणूक फर्म सॉफ्टबँक ग्रुप, वॉरेन बफेटची बार्कशायर हॅथवे आणि चीनी वित्तीय तंत्रज्ञान कंपनी अँट ग्रुप यांचा समावेश आहे.

अनेकांनी हा आयपीओ ओव्हरसबस्क्राईब झाल्याचं सांगितलं. मात्र, आतापर्यंतचा सर्वात मोठा पेटीएम आयपीओ फ्लॉप ठरल्याचं चित्र आहे.

loading image
go to top