Penny Stockचा 5 महिन्यात 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; पण तज्ज्ञ काय सांगतात

शेअर बाजारातल्या अस्थिर वातावरणात अनेक शेअर्स असे आहेत ज्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परफॉर्म केले आहे.
stock market
stock market Sakal

शेअर बाजारातल्या अस्थिर वातावरणात अनेक शेअर्स असे आहेत ज्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परफॉर्म केले आहे. 2022 च्या आर्थिक वर्षांत त्यांनी गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. SEL मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक गेल्या पाच महिन्यांत 2,476% वाढल्याचे ACE इक्विटीकडील डेटा सांगतो. कंपनीचे शेअर्स 27 मे 2022 रोजी 970.10 पर्यंत वाढले, जे गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी 37.65 होते. दुसरीकडे, बेंचमार्क BSE सेन्सेक्स याच कालावधीत जवळपास 6% घसरला आहे.

(Share Market Updates)

अशच काही स्टॉक्समध्ये कैसर कॉर्पोरेशन (2,245% वर), हेमांग रिसोर्सेस (1,102% वर), गॅलॉप्स एंटरप्रायझेस (1,098% वर), अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स (1057% वर), मिड इंडिया इंडस्ट्रीज (922% वर) आणि सेजल ग्लास (915% वर) यांचा समावेश आहे. 915%) या सर्व शेअर्सने गेल्या पाच महिन्यांत बाजारात चांगली उसळी घेतली आहे.

stock market
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

या कालावधीत, बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 9 टक्के आणि 13 टक्क्यांनी घसरले. बिझनेसटॉडे.इन नुसार, बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना निवडक स्मॉलकॅप शेअर्सच्या आकर्षक परताव्याच्या मोहात न पडण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी, त्यांनी बाजारात चालू असलेल्या विक्रीचा दबाव लक्षात घेऊन लार्जकॅप्स शेअर्ससह जाण्याचा सल्ला दिला आहे.

2022 मध्ये लार्जकॅपमध्ये सुरक्षितता असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूकदार स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार म्हणाले. गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी घाई करण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी त्यांचे SIP चालू ठेवावे आणि शक्य असल्यास SIP रक्कम वाढवावी असेही ते म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com