पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली  - आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढू लागल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर काल दोन महिन्यांत प्रथमच प्रतिलिटर ७७ रुपयांवर गेला. दिल्लीत काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९ पैसे वाढ होऊन तो ७७.०६ रुपयांवर गेला. याच वेळी डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ होऊन तो ६८.५० रुपयांवर गेला.

देशातील सर्व महानगरे आणि राज्यांच्या राजधानींशी तुलना करता दिल्लीत पेट्रोल सर्वांत स्वस्त आहे. स्थानिक कर अथवा मूल्यवर्धित कर कमी असल्याने दिल्लीत इंधनाचा दर कमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव ३० जुलैपासून वाढू लागले आहेत. यामुळे मागील ९ दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९० पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८८ पैसे वाढ झाली आहे. याआधी ९ जूनला पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७७.०२ रुपयांवर गेला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol diesel price hike