esakal | आर्थिक गणित बिघडणार; सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ!
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel rate

आर्थिक गणित बिघडणार; सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ!

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Petrol and Diesel Price in India Latest Updates: लागोपाठ सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. आधीच कोरोना महामारीने सर्वसामान्य आर्थिक अडचणीत असताना इंधन दरवाढीमुळे नवीन संकट उभं राहिलं आहे. रविवारी देशभरात पेट्रोल प्रतिलिटर 25 ते 30 पैशांनी महागलं तर डिझेल प्रतिलिटर 35 ते 40 पैशांनी महागलं आहे. महाराष्ट्रात डिझेलने शंभरीपार केली आहे. मुंबईसह औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर शंभरी नजीक पोहोचले आहेत. देशांतर्गत सध्या असलेले इंधनाचे दर हे आतापर्यंतचे सर्वाधिक असावेत. त्यामुळे एकूणच राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला असून, दरवाढ सातत्याने सुरू राहिल्यास इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईची शक्यताही अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची किंमत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 22 सप्टेंबरला क्रूड ऑईलची किंमत प्रतिबॅलर 70.70 डॉलर होती. परंतु, आता ती किंमत 80 डॉलरकडे पोहचली आहे. इंधनाची मागणी वाढल्याने काही दिवसांत क्रूड ऑईलची किंमत आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर अंदाजित दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

राजधानी दिल्ली :

पेट्रोल – 104.14 रुपये प्रति लीटर

डिझेल - 92.82 रुपये प्रति लीटर

मुंबई :

पेट्रोल – 110.12 रुपये प्रति लीटर

डिझेल – 100.66 रुपये प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – 104.80 रुपये प्रति लीटर

डिझेल – 95.93 रुपये प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 101.53 रुपये प्रति लीटर

डिझेल – 97.26 रुपये प्रति लीटर

भोपाळ:

पेट्रोल – 112.69 रुपये प्रति लीटर

डिझेल – 101.91 रुपये प्रति लीटर

बंगळुरु:

पेट्रोल – 107.77 रुपये प्रति लीटर

डिझेल – 98.52 रुपये प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 101.18 रुपये प्रति लीटर

डिझेल - 93.26 रुपये प्रति लीटर

आपल्या शहरात काय आहेत भाव? (How to check petrol-diesel price)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती (how to decide price of petrol and diesel)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.

loading image
go to top