
मागील 15 दिवसात तब्बल 13 वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. ट्विटरवर देखील यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. पण 1 जूनपासून दरवाढीस पुन्हा सुरूवात झाली.
Petrol Diesel Price : पेट्रॉल आणि डिझेलच्या दराने दोन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. सोमावीर पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 28 आणि 29 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे अनेक शहरातील पेट्रोल दर पुन्हा एकदा नव्वदीच्या पार गेले आहेत. मुंबईमध्ये 6 डिसेंबरला पेट्रोलचे दर 90.05 रुपये तर डिझेलचे दर 80.23 रुपये प्रतिलिटर होते.
मागील 15 दिवसात तब्बल 13 वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. ट्विटरवर देखील यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. पण 1 जूनपासून दरवाढीस पुन्हा सुरूवात झाली. 22 सप्टेंबरपासून सरकारने दरवाढीला ब्रेक लावला. 20 नोव्हेंबरला पुन्हा दरवाढ केली. गेल्या 17 दिवसांमध्ये पेट्रोलचे दर 2.35 रुपयांनी तर डिझेलचे दर 3.15 रुपयांनी वाढले आहेत.
देशातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा
मुंबईत 4 ऑक्टोबर 2018 मध्ये पेट्रोलचे दर 91.39 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर्स प्रतिबॅरल एवढे होते. आता कच्च्या तेलाचे दर 48 डालर्स असूनही दर मात्र कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
उत्पादन शुल्कात मोठी वाढ हेच मुख्य कारण
केंद्र सरकारकडून सध्या पेट्रोलवर 32.98 रुपये तर डिझेलवर 31.83 रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते आहे. महाराष्ट्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 26 आणि 24 टक्के व्हॅट आकारला जातो. एवढेच नाही तर त्यावर अनुक्रमे 10.20 रुपये आणि 3 रुपये सेसही घेण्यात येतो. त्यामुळे दरवाढीत कराचाच मोठा झोल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.