Petrol Diesel Price : डिझेल दराने गाठली ऐतिहासिक उच्चांकी; पेट्रोल दरातही दिलासा नाहीच!

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

राज्यातील अनेक शहरातील पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

petrol diesel price : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढल आहेत. मुंबईत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली असून, पेट्रोलचे दरही आतापर्यंतच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या बरोबरीचे आहेत. मुंबईत सध्या पेट्रोलचे दर 90.34 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचेदर 80.47 रुपये आहेत. डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहेत. दुसरीकडे पेट्रोलचे दर 4 ऑक्टोबर, 2018च्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. राज्यातील अनेक शहरातील पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

प्रत्येक दिवशी बदलतात इंधनाचे दर 
प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता इंधनाच्या दरात बदल होत असतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी (उत्पादन शुल्क), डिलर कमिशन आणि अन्य कर मिळून तेलाच्या किंमती या दुप्पट होत असतात.  

प्रत्येक दिवशी बदलणारे दर पाहायचे कसे? 

तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून ज्या त्या दिवसाचे नवीन दराचे अपडेट्स मिळवू शकता. इंडियन ऑयलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, RSP च्यासोबत आपल्या शहराचा कोड टाइप करुन 9224992249 नंबर वर SMS करुन तुम्हाला इंधनाच्या दराची माहिती मिळवता येते. प्रत्येक शहराचा कोड हा वेगळा असतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol diesel price today 12 december 2020 no change in fifth day in a row