
Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Prices Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑईलच्या ताज्या आकडेवाडीनुसार दिल्ली, मुंबईसह देशातील चार महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
क्रूड ऑईल महागलं:
वास्तविक, मुख्य आर्थिक सल्लागारांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, जोपर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल डॉलक 110 पेक्षा कमी आहेत, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास त्याचा भार सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून उचलावा लागेल. अशा परिस्थितीत आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता बळावली आहे.
हेही वाचा: Petrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्चं तेल महागलं; पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-
दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर
Web Title: Petrol Diesel Price Updates 7th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..