Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. आजही तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये (दिल्ली डिझेलची किंमत) आहे.

इतर सर्व महानगरांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपयांना विकले जात आहे. त्याचवेळी डिझेल ९९.८३ रुपयांना विकले जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे एक लिटर पेट्रोल 110.85 रुपयांना मिळते. त्याच वेळी, डिझेल 100.94 रुपयांना उपलब्ध आहे.

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल/ डिझेल

दिल्ली- 105.41/ 96.67

मुंबई- 120.51/ 104.77

कोलकाता- 115.12/ 99.83

चेन्नई- 110.85/ 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता