कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
कच्चं तेल पुन्हा एकदा महाग होऊ लागलं आहे.
नवी दिल्ली : कच्चं तेल पुन्हा एकदा महाग होऊ लागलं आहे. प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली जाणारं कच्चं तेल पुन्हा 100 डॉलरच्या वर पोहोचलंय. कच्चं तेल स्वस्त झाल्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Prices) किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चीन आणि भारतासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये इंधनाचा वापर वाढण्याची चिन्हं दिल्यामुळं कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) आज (बुधवार) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाहीय. देशातील चार महानगरांमध्ये 6 एप्रिलपासून तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाहीय. मात्र, केंद्रानं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर मे महिन्यात पेट्रोल 9 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं.
चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
'या' शहरांमध्ये नवे भाव सुरू
नोएडामध्ये पेट्रोल 96.92 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर झालं आहे.
लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झालं आहे.
पाटण्यात पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर झालं आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.