भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडणार? कारण...

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे भारतात देखील पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण आणि कच्च्या तेलाची निर्यात करणारी कंपनी असलेल्या असलेल्या सौदी अरेबियाच्या अरमॅको कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे पडसाद आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट होईल या शक्यतेने आज कच्च्या तेलाचे भाव कमोडिटी मार्केटमध्ये तब्बल 8.50 टक्क्यांनी वधारले होते. आता वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे भारतात देखील पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. 

इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीवर हल्ला केल्याचे बोलले गेले. मात्र इराणने हा दावा फेटाळला आहे. असे असले तरी, हल्ला झालेल्या अबाकिक आणि खुराइस येथील तेल उत्पादन 57 टक्क्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलाझिज बिन सलमान यांनी स्पष्ट केल्यानंतर तेलाच्या किंमतीवर अपेक्षित परिणाम पाहायला झाल्याचे मिळत आहे.

सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. या निर्णयामुळे तब्बल दिवसाला 5.7मिलियन बॅरल उत्पादन कमी होणार असल्याने पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol, diesel prices likely to increase after Saudi oil attacks. Check todays rates