esakal | दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

बोलून बातमी शोधा

पेट्रोल
दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका
sakal_logo
By
नामदेव कुंभार

Petrol & Diesel Prices : पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचा (Assembly Election 2021) निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरु झाला आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवार दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 19 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागलं. राजधानीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 90.74 रुपये तर डिझेल 81.12 रुपये इतकं झालं आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. (Petrol, diesel prices up for second day in a row across India)

मागील 20 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol & diesel prices) दर स्थिर होते. मंगळवारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ घोषीत केली. मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये (Delhi)मध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९०.५५ रुपयांवर पोहोचले, तर डिझेल (Diesel) प्रतिलिटर ८१ रुपयांच्या जवळपास पोचले. दुसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली. बुधावारी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 90.74 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 81.12 रुपये मिळेल. मुंबईत बुधवारी पेट्रोल प्रतिलिटर 97.12 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 88.19 रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 92.0 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 86.09 रुपये. कोलकातामध्ये पेट्रोल प्रतिलिटर 90.10 आणि डिझेल प्रतिलिटर 83.98 रुपयांना मिळेल.

हेही वाचा: 20 दिवसानंतर पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं; पाहा आजचे दर

यापूर्वी पेट्रोल आणि झेलच्या किंमतीत १५ एप्रिल रोजी कपात करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल १६ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १४ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले होते. तेव्हापासून, तेलाच्या किंमती स्थिर होत्या. पण १८ दिवसांनंतर आता किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

दररोज बदलतात किंमती

दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. विदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर काय आहेत यावरून हे दर ठरवले जातात. तसेच यामध्ये अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी पकडल्यास त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.