esakal | Petrol-Diesel Hike |देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

Petrol-Diesel Hike |देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम

sakal_logo
By
ओमकार वाबळे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. आजही पुन्हा किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्य खिशाला कात्री लागली आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी देशभरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी विक्रम नोंदवला. दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले.

दिल्लीत पेट्रोल आता 101.89 रुपये प्रति लीटर दराने विकण्यात येत आहे. तर डिझेलने आज पहिल्यांदा 90 रुपयांचा टप्पा पार केला. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत आता 107.95 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 97.84 रुपये आहे, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूडचे दर 80 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास पोहचले आहे. त्यामुळे दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपल्या शहरात काय आहेत भाव?

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात.

loading image
go to top