
तीन वर्षात पेट्रोल डिझेल च्या टॅक्सवर सुमारे ८.०२ लाख कोटींची कमाई
दिल्ली : केंद्र सरकार ने मागील तीन आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेल च्या टॅक्सवर सुमारे ८.०२ लाख कोटींची कमाई केली आहे. यातील २०२१ या एकट्या आर्थिक वर्षात ३.७१ लाख कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत ही माहीती दिली. अर्थमंत्र्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल मधून झालेल्या कमाई विषयी प्रश्नांना उत्तर देताना पेट्रोल आणि डिझेल च्या उत्पादन शुल्क आणि त्यावरील विविध टॅक्समधून केलेल्या कमाईचे विवरण दिले.
किती वाढले पेट्रोल डिझेलचे उत्पादन शुल्क ?
राज्यसभेतील लिखित स्वरूपातील उत्तरात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, ५ ऑक्टोबर २०१८ ला पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १९.४८ रु. प्रतीलीटर इतके होते. ते वाढून ४ नोव्हेंबर २०२१ ला २७.९० रुपये प्रतीलीटर झाले. याप्रकारे डिझेलवरील उत्पादन शुल्क १५.३३ रुपये प्रतीलीटर पासून वाढून २१.८० रुपये इतके झाले. यादरम्यान ५ ऑक्टोबर २०१८ ला पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १९.४८ रु. प्रतीलीटर इतके होते ते खाली येऊन ६ जुलै २०१९ पर्यंत १७.९८ इतके झाले होते. तसेच डिझेलवरील उत्पादन शुल्क जे ५ ऑक्टोबर २०२१ ला १५.३३ रुपये प्रतिलीटर येवढे होते ते खाली येऊन १३.८३ रुपये इतके झाले.
हेही वाचा: उलटलेल्या टँकरमधलं तेल लुटायला गेले आणि ६० जणांनी गमावला जीव
पेट्रोल डिझेलच्या टॅक्समधून किती कमाई ?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये पेट्रोल आणि डिझेल मधून एकत्रित टॅक्स आणि उत्पादन शुल्कामधून २,१०,२८२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याप्रमाणे २०१९-२० मध्ये सरकारने २,१९,७५० कोटी रुपये कमावले आणि २०२०-२१ मध्ये ३,७१,९०८ कोटी रुपये कमावले आहेत.
सरकार ने यावर्षी दिवाळीच्या आधी ४ नोव्हेंबर २०२१ ला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ५ रुपये आणि १० रुपये प्रतीलिटर कपात केली. त्यानंतर काही राज्यांनीसुद्धा मुल्यावर्धित करांमध्ये कपात केलेली दिसून आली.
Web Title: Petrol Diesel Tax Income 802 Lakh Crore Three Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..