
कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. यात अजून भर पडली आहे ती, जागतिक बाजारात उतरत असलेले कच्च्या तेलाचे भावामुळे.
Petrol Price Today - सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त; आजचे दर किती?
नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. यात अजून भर पडली आहे ती, जागतिक बाजारात उतरत असलेले कच्च्या तेलाचे भावामुळे. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात ब्रेंट क्रुड तेलाच्या किंमती घसरल्या (Crude Oil Cheaper) आहेत. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती 7 टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरी डोमेस्टीक मार्केटमध्ये त्याचा परिणाम दिसला नाही.
भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies-HPCL,BPCL IOC) आजही डिझेलचे भाव कमी केल्याचे सांगितले आहे. डिझेलच्या किंमती 16 पैसे प्रतिलिटर कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे देशात पेट्रोलचे भाव मागील 2 दिवसांपासून स्थिर आहेत. शनिवारी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 81.06 रुपये होते. तर आता डिझेलच्या नव्या किंमती 70.09 रुपये प्रतिलिटर आहेत. या महिन्यातील 10 तारखेपासून पेट्रोल काही प्रमाणात स्वस्त होत गेलंय. 22 तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 1.02 रुपयांनी कमी झाले होते. तर 3 सप्टेंबरपासून डिझेलही स्वस्त होत जाऊन त्यात 2.62 रुपयांची घट दिसून आली.
Economic Crisis : आर्थिक संकट काही हटेना; रुपयाची घसरण सुरूच!
देशातील मुख्य शहरांतील पेट्रोल-डिझेलचे प्रतिलिटर दर-
दिल्ली- पेट्रोल(81.6), डिझेल(70.94)
मुंबई- पेट्रोल(87.74), डिझेल(77.36)
कोलकाता- पेट्रोल(82.59), डिझेल(74.46)
चेन्नई- पेट्रोल(84.14), डिझेल(76.40)
नोएडा- पेट्रोल(81.58), डिझेल(71.40)
लखनौ- पेट्रोल(84.18), डिझेल(75.07)
पटना- पेट्रोल(83.73), डिझेल(76.50)
चंदीगड- पेट्रोल(77.99), डिझेल(75.07
Gold Silver Price : सोने-चांदी दरात चढ-उतार; आजचा दर काय?
पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलत असतात. सकाळी 6 वाजता त्यांचे नवीन दर येत असतात.
(edited by- pramod sarawale)
Web Title: Petrol Price Today Diesel Price Fuel 26 September
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..