
PF account : पीएफ खातेधारकांसाठी आनंदवार्ता ! खात्यात येणार एवढी रक्कम
मुंबई : आज प्रत्येक नोकरदार व्यक्तीचे EPFO मध्ये खाते आहे. जेणेकरून पगाराचा काही भाग वाचून नंतर वापरला जाईल. तसेच सरकार त्यावर भरमसाठ व्याज देते. यामुळे पीएफ खातेदाराला भरपूर कमाई होते. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून EPF वर 8.1 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
जाणून घ्या खात्यात किती पैसे येतील ?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) जमा केलेल्या रकमेवरील व्याजदरावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.1% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या महिन्यात पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार व्याजाचे पैसे टाकू शकते.
आता पीएफ खातेधारकाच्या खात्यात व्याजाची रक्कम येईल, ती त्याच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असेल. सरकार जमा केलेल्या रकमेवर ८.१ टक्के दराने व्याजाची रक्कम हस्तांतरित करेल. समजा तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा आहेत, तर 8.1 टक्के दराने तुम्हाला वार्षिक 8,100 रुपये व्याज मिळतील.
अशा प्रकारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासा
ईपीएफओच्या वेबसाइटवर जा. 'आमच्या सेवा' च्या ड्रॉपडाउनमधून 'कर्मचाऱ्यांसाठी' निवडा. त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. आता UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.