
आयओएल केमिकल्स ही एक आघाडीची फार्मा कंपनी आहे.
2022 मध्ये IOL Chemicals ठरणार सुपरस्टार! तज्ज्ञांना विश्वास
Superstar stock in 2022 : 2022 मध्ये तुम्ही पोर्टफोलिओसाठी (Portfolio) मजबूत स्टॉक (Stock)शोधत असाल, तर फार्मा कंपनी (Pharma co.) आयओएल केमिकल्स (IOL Chemicals) ही एक चांगला पर्याय ठरू शकतो. आयओएल केमिकल्स ही एक आघाडीची फार्मा कंपनी आहे. आयबुप्रोफेनचे उत्पादन करणारी ही भारतातील सर्वोच्च कंपनी आहे. शेअर बाजार तज्ज्ञ शरद अवस्थी यांनी 900 रुपयांच्या टारगेट सह हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: Short Term Stocks: मजबूत नफा हवा आहे, मग या 2 स्टॉक्सचा नक्की विचार करा
2021 मध्ये अंडरपरफॉर्म (Underperform)
2021 मध्ये आयओएल केमिकल्सचा (IOL Chemicals) रिटर्न चार्ट पाहता आत्तापर्यंत 37 टक्के नकारात्मक परतावा मिळाला आहे. शेअरने वर्षभरात 783 रुपयांची सर्वोच्च पातळीही गाठली. 28 डिसेंबर 2021 रोजी, शेअरची किंमत सुमारे 468 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना 2022 मध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 92 टक्के परतावा मिळू शकतो.
2022 मध्ये ठरणार सुपरस्टार स्टॉक (Superstar stock)
आयओएल केमिकल्सची गणना आजच्या काळात आयबुप्रोफेनच्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते. कंपनीचा सुमारे 80 टक्के महसूल आयबुप्रोफेन (Ibuprofen) आणि इथाइल एसीटेट (Ethyl acetate) या दोन उत्पादनांमधून येतो. इथाइल एसीटेटमध्ये कंपनीचा विस्तार होत आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी दिसून येईल. गेल्या 3 वर्षात कंपनीने 4-5 एपीआय उत्पादने लाँच केली आहेत. यामुळे कंपनी दरवर्षी अंदाजे सुमारे 300-400 कोटी रुपयांचा कॅश फ्लो जनरेट करेल.
हेही वाचा: Stocks | 'हे' 4 स्टॉक्स एका महिन्यात देतील चांगली कमाई!
कंपनीवर शून्य कर्ज
कंपनी आता कर्जमुक्त आहे आणि भविष्यातही कर्जमुक्त राहण्याची अपेक्षा आहे. कंपनी पुढील 2 वर्षांत 15 टक्के CAGR सहज साध्य करेल असा विश्वास अवस्थी यांना आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Pharma Company Iol Chemicals Is A Great Choice For Portfolio
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..