प्लॅटिनम उत्पादनांची भविष्यात मागणी वाढेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचा अंदाज

वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचा अंदाज

मुंबई: प्लॅटिनम गुंतवणुकीचे माध्यम म्हणून जागतिक बाजारात प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे सोने आणि प्लॅटिनमला फायदेशीर ठरत असून, नजीकच्या काळात या मौल्यवान धातूंच्या किमती चढ्या राहतील, असा अंदाज वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे संचालक मार्कस ग्रब यांनी व्यक्त केला आहे. सोने-चांदीच्या तुलनेत महाग असलेल्या प्लॅटिनमला सहज उपलब्ध करण्यासाठी मुथ्थूट पापाचान ग्रुपने पुढाकार घेतला आहे. समूहातील कंपनी मुथ्थूट एक्‍झीमने वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलबरोबर भागीदारी करून प्लॅटिनमच्या विविध वस्तू बचत किंवा संचय योजनांतून ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

याविषयी बोलताना मूथ्थूट पापाचनचे मुख्य कार्यकारी केयूर शाह म्हणाले, ""भारतीयांमध्ये अजूनही सोने आणि हिऱ्यांचे आकर्षण आहे. गेल्या काही वर्षांत ठराविक वर्गामध्ये प्लॅटिनम लोकप्रिय होऊ लागले आहे. प्लॅटिनम उत्पादनांना चालना देण्यासाठी मुथ्थूट समूहाकडून प्लॅटिनममधून देवदेवतांच्या मूर्ती, पुतळे आदी बनवले जाणार आहेत. ही उत्पादने मासिक हप्त्यांमध्ये उपलब्ध असल्याचे सामान्यांनाही सहज खरेदी करता येतील.'' प्लॅटिनम योजना मुथ्थूट फीनकॉर्पच्या 624 शाखांमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: platinum products requirement raise in future