esakal | ‘पीएनबी’ला ४९२ कोटींचा तोटा
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएनबी’ला ४९२ कोटींचा तोटा

‘पीएनबी’ला ४९२ कोटींचा तोटा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) तिसऱ्या तिमाहीत ४९२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. बॅंकेला वाढत्या थकीत कर्जाच्या पार्श्‍वभूमीवर तरतुदीत वाढ करावी लागल्याने तोट्यात वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील आर्थिक वर्षी याच तिमाहीत बॅंकेने २४६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता. बॅंकेला सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ५०७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तिसऱ्या तिमाहीत बॅंकेचे एकूण उत्पन्न १५ हजार ९६७ कोटी रुपयांवर पोचले आहे. मागील आर्थिक वर्षी याच तिमाहीत ते १४ हजार ८५४ कोटी रुपये होते. ‘पीएनबी’ने थकीत कर्जाच्या तरतुदीसाठी तिसऱ्या तिमाहीत ४ हजार ४४५ कोटींची तरतूद केली आहे. 
 

loading image
go to top