
सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 507.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा
पंजाब नॅशनल बॅंकेचा नफा 507 कोटींवर
मुंबई, ता. 5 (वृत्तसंथा): सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 507.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बॅंकेने 4,532.35 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत 'पीएनबी'ला 13,291.92 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 7.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. ते आता 4,263.84 कोटी रुपयांवर पोचले आहे.
बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक आधारावर 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसऱ्या तिमाहीत बॅंकेने 2,928.90 कोटी रुपयांची तरतूद विविध खर्चासाठी केली आहे.
जी गेल्यावर्षी याच तिमाहीत केलेल्या तरतुदीपेक्षा 44 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ती 2,023.31 कोटी रुपये होती. बॅंकेचे एकूण थकित कर्जाचे प्रमाण 17.16 टक्क्यांवरून 16.76 टक्क्यांवर आले आहे. तर निव्वळ थकित कर्जाचे प्रमाण 8.90 टक्क्यांवरून 7.65 टक्क्यांवर आले आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात पीएनबीचा शेअर 5.06 टक्क्यांच्या घसरणीसह 64.75 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 29,811 कोटींचे बाजारभांडवल आहे.
Web Title: Pnb Q2 Profit Rs 507 Cr
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..