‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेसह (पीएनबी) विविध आर्थिक गैरव्यवहारांची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेवर आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. याचिकेत पंतप्रधान व अर्थमंत्री यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हे आरोप अनावश्‍यक व निराधार असल्याचे सांगत या याचिकेवर सुनावणी घेता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: PNB Scam Inquiry by SIT