देशातील वीजेच्या खपात १४ टक्क्यांची घट;  मे महिन्यात १०३.०२ अब्ज युनिट्सचा वापर

वृत्तसंस्था
Monday, 1 June 2020

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्यामुळे देशातील वीजेचा वापर घटला आहे.एप्रिल महिन्यात वीजेचा खप २२.६५टक्क्यांनी घटला होता. संपूर्ण एप्रिल महिन्यात वीजेच्या मागणीत मोठी घट नोंदवण्यात आली होती.

कोविड-१९ महामारीमुळे देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील वीजेचा खप मे महिन्यात १४.१६ टक्क्यांनी घटला आहे. मे महिन्यात १०३.०२ अब्ज युनिट्सचा वापर झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात १२०.०२ अब्ज युनिटचा वापर झाला होता. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्यामुळे देशातील वीजेचा वापर घटला आहे. एप्रिल महिन्यात वीजेचा खप २२.६५ टक्क्यांनी घटला होता. संपूर्ण एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे वीजेच्या मागणीत मोठी घट नोंदवण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सरकारने काही नियमांसह कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्यास सुरूवात केल्यानंतर आणि तापमानाचा पारा ४५ अंशांच्या वर गेल्यामुळे देशातील वीजेचा वापर मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत वाढला आहे. वीजेच्या वापराची माहिती वीज मंत्रालयाने दिली आहे. एप्रिलमध्ये वीजेचा वापर २२.६५ टक्क्यांनी घटून ८५.१६ अब्ज युनिटवर आला होता. मागील वर्षी एप्रिलमध्ये ११०.११ अब्ज युनिटचा खप झाला होता. २६ मेला सर्वाधिक वीजेचा वापर म्हणजेच १६६.४२ गीगावॅटचा वापर नोंदवण्यात आला आहे. 

व्यावसायिक आणि औद्योगिक मागणी घटण्याबरोबरच तुलनात्मकरित्या एप्रिलमध्ये कमी तापमान नोंदवण्यात आल्याचाही परिणाम वीजेच्या वापरावर झाला आहे. मात्र मे महिन्यात व्यावसायिक कामकाजाबरोबरच तापमानसुद्धा ४५ अंशाच्या वर गेल्याने तुलनात्मकरित्या वीजेचा खप वाळा आहे. १ जूनपासून सरकारने अनेक बाबतीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरूवात केली आहे. अर्थचक्र पुन्हा सुरू झाल्यामुळे आगामी काळात वीजेची मागणी वाढणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power consumption declines by 14 percent in May

Tags
टॉपिकस
Topic Tags: