स्मार्ट माहिती : ‘एनएफटी’चा बोलबोला

साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर ‘नॉन फंजिबल टोकन’ म्हणजे ‘एनएफटी’ ही एक डिजिटल मालमत्ता असते. एखाद्या खऱ्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल मालमत्ता असते.
स्मार्ट माहिती : ‘एनएफटी’चा बोलबोला
Summary

साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर ‘नॉन फंजिबल टोकन’ म्हणजे ‘एनएफटी’ ही एक डिजिटल मालमत्ता असते. एखाद्या खऱ्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल मालमत्ता असते.

- प्रणव मंत्री

साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर ‘नॉन फंजिबल टोकन’ म्हणजे ‘एनएफटी’ ही एक डिजिटल मालमत्ता असते. एखाद्या खऱ्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल मालमत्ता असते. ती कोणत्याही डिजिटल कार्याचे प्रतिनिधित्व करते. कला, गाणी, छायाचित्रे, ट्रेडिंग कार्ड, इतर संग्रहणीय वस्तू इ.

एनएफटी ही नॉन फंजिबल पैलू, वैशिष्ट्य आणि दुर्मिळता निर्माण करतात, ज्यामध्ये निर्मात्याचे मूळ कार्य सत्यापित केले जाऊ शकते. ही खरी वस्तू संगीत, कला, खेळणी, गेम, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट आदी विविध वस्तूंचे डिजिटल स्वरुपात प्रतिनिधित्व करणारी मालमत्ता किंवा टोकन असते. मात्र, याच्या नावात असल्याप्रमाणे म्हणजे हे नॉन फंजिबल टोकन असल्यामुळे याची इतर वस्तूशी अदलाबदल होऊ शकत नाही. हे युनिक असते आणि दुसऱ्या कशानेही न बदलता येणारे असते.

अलीकडच्या काळात ‘एनएफटी’ हे कलेशी निगडीत वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी लोकप्रिय झाले आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे एनएफटी कलेक्शन तब्बल ९,६६,०० डॉलर (७.१८ कोटी रुपये) मध्ये विकले गेले आहे. त्यांच्या एनएफटी संग्रहणीय वस्तू त्यांच्या चाहत्यांनी club.com साइटवरून खरेदी केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या एनएफटी संग्रहणीय मालिकेत त्यांच्या वडिलांची प्रसिद्ध कविता ‘मधुशाला’, स्वतःचे ऑटोग्राफ केलेले विंटेज पोस्टर, त्यांच्या इतर कामांसह समाविष्ट होते.

‘एनएफटी’द्वारे पैसे कसे कमवतात?

मागील ४-५ वर्षांत ‘एनएफटी’ हे डिजिटल चलन तेजीने वाढले आहे. ‘एनएफटी’ हा एक प्रकारचा डिजिटल कलेक्शन प्लॅटफॉर्म आहे. यावर आर्टवर्क, शोभेच्या वस्तू, चित्र, फोटो, जुने कलेक्शन, म्युझिक आणि इतर काहीही डिजिटल स्वरुपात उपलब्ध होते. ज्यांना यात रस असतो, ते या वस्तू विकत घेतात. जे या वस्तू विकतात, त्यांना यातून मोठी कमाई होते. एका अहवालानुसार, ‘एनएफटी’ची विक्री १७ अब्ज डॉलरचा आकडा ओलांडू शकते. २०२२ मध्येही याची बाजारपेठ तेजीत राहील, असे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

‘एनएफटी’ आणि लोकप्रियता!

डिजिटल जगतात क्रिप्टोकरन्सीशी स्पर्धा करण्यासाठी ‘एनएफटी’ची घोडदौड सुरू झाली आहे. गुगल ट्रेंडच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये लोकांनी क्रिप्टोकरन्सीपेक्षा जास्त ‘एनएफटी’ला सर्च केले होते. ‘एनएफटी’ची लोकप्रियता एवढी आहे, की सेलिब्रिटींपासून कंपन्यांपर्यत सर्वांनीच यात एंट्री केली आहे. अलीकडेच जगातील पहिला एसएमएस विकला गेला. हा एसएमएस १९९२ मध्ये पाठविण्यात आला होता. ‘व्होडाफोन’ने तो एसएमएस ‘एनएफटी’च्या रुपात १.०७ लाख युरो म्हणजे जवळपास ९१ लाख १५ हजार रुपयांना लिलावात विकला.

‘एनएफटी’ हा एक फुगा आहे का?

काही लोकांना वाटते, की एनएफटी हा फुगा आहे आणि तो लवकरच फुटेल, तर काहींच्या मते येणारे भविष्य ‘एनएफटी’चे असणार आहे; ज्यामुळे अनेक उदयोन्मुख कलाकार, प्रतिभावान व्यक्तींना आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, कलाकृती या व्यासपीठाद्वारे जगासमोर आणण्याची संधी मिळणार आहे. येत्या काळामध्ये हे तंत्रज्ञान किती पुढे वाढेल किंवा येत्या काळात याला किती वाव आहे, हे स्पष्ट होईलच. पण माझ्या मते येऊ घातलेल्या नवनवीन संकल्पना, माहिती, तंत्रज्ञान समजून घेण्यात कोणतेच नुकसान नाही. आपल्या ज्ञानात वाढ झालेली कधीही चांगलीच!

(लेखक सीए, कॉर्पोरेट ट्रेनर, मेंटॉर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com