बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

चांगले जागतिक संकेत आणि देशांतर्गत बाजारातील मजबूत शॉर्ट कव्हरिंगमुळे सेन्सेक्स-निफ्टी वधारल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.
Share Market Update
Share Market UpdateSakal

गुरुवारी शेअर बाजारात तेजीत दिसून आली. बाजार गुरुवारी गेल्या 4 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 427 अंकांनी वाढून 54178 वर तर निफ्टी 143 अंकांनी चढून 16133 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही वधारले. बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स वधारले. मेटल, रियल्टी, बँकिंग शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. ऑटो, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली.

निफ्टी बँक 596 अंकांनी वाढून 34,920 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 368 अंकांनी वाढून 27,572 वर बंद झाला. निफ्टीमधील 50 पैकी 38 शेअर्स वधारले. त्याचवेळी सेन्सेक्सच्या 30 पैकी 21 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स तेजीत होते.

Share Market Update
निधीच्या व्यवस्थापनास शिस्त लावा; रिझर्व बँकेचा राज्य सरकारांना सल्ला

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

चांगले जागतिक संकेत आणि देशांतर्गत बाजारातील मजबूत शॉर्ट कव्हरिंगमुळे सेन्सेक्स-निफ्टी वधारल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सर्व चांगले शेअर्स सध्या स्वस्तात मिळत आहेत. यामुळे सध्याच्या वातावरण चांगले नसतानाही गुंतवणूकदारांना काही मजबूत शेअर्समध्ये खरेदी करण्याची संधी दिसत आहे.

चांगल्या पुलबॅक रॅलीनंतर निफ्टी 16,000 च्या वर जाण्यात यशस्वी झाला आहे, जे पॉझिटीव्ह संकेत आहेत. पण, मजबूत अपट्रेंड रॅलीनंतर, निफ्टीने डेली चार्टवर एक लहान हॅमर कॅन्डल तयार केली आहे जी इंट्राडे करेक्शनची शक्यता दर्शवते. जोपर्यंत निफ्टी 16,000 च्या वर राहील तोपर्यंत तेजीचा कल राहण्याची शक्यता आहे. लवकरच निफ्टी 16,200-16,275 च्या पातळीला स्पर्श करताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी 16,000 च्या खाली घसरला तर तो 15,950-15,900 वर जाताना पाहू शकतो.

निफ्टीने गुरुवारी गॅप-अप ओपनिंगसह 16,000 ची पातळी ओलांडल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. तांत्रिक दृष्टीकोनातून, तो त्याच्या 45-दिवसांच्या EMA आणि घसरणीच्या ट्रेंड लाइनच्या वर बंद करण्यात यशस्वी झाला. आता जर निफ्टी 16,200 ची पातळी गाठण्यात यशस्वी झाला तर आपण यामध्ये 16,500 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर ते 16,200 च्या खाली सरकले तर पुढील सपोर्ट 16,000 वर असेल.

Share Market Update
शेअर बाजारात तेजी; 'या' बँकिंग अन् आयटी शेअर्समध्ये वाढ

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
टायटन (TITAN)
टाटा स्टील (TATASTEEL)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
लॉरुस लॅब (LAURUSLABS)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
एमआरएफ (MRF)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

Share Market Update
सेन्सेक्समध्ये 425 अंकाची तेजी, शेअर मार्केटमध्ये विक्रीचा जोर कायम

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com