बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

जागतिक बाजारपेठेतील वाढ, विशेषत: अमेरिकन बाजार आणि अनुकूल देशांतर्गत ट्रिगर्समुळे बाजारात तेजी दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.
Pre Analysis Of Share Market
Pre Analysis Of Share Marketesakal

बुधवारी सलग सातव्या दिवशी बाजार तेजीत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी 5 एप्रिलच्या वरच्या पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 418 अंकांनी वाढून 60260 वर बंद झाला आणि निफ्टी 119 वर चढून 17944 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 222 अंकांनी वाढून 39462 वर बंद झाला. तर मिडकॅप 147 अंकांनी वाढून 31,401 वर बंद झाला.

Pre Analysis Of Share Market
Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

त्याचवेळी, मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी वाढ झाली. निफ्टीमधील 50 पैकी 33 शेअर्स वधारले. तर सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 10 शेअर्स तेजीत होते. आयटी, एफएमसीजी आणि एनर्जी शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी संबंधित शेअर्समध्येही चांगला नफा दिसला.

Pre Analysis Of Share Market
Share Market: आज शेअर बाजारात तेजी, Nifty 17,944 वर तर Sensex 418 अंकांनी वधारला

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

जागतिक बाजारपेठेतील वाढ, विशेषत: अमेरिकन बाजार आणि अनुकूल देशांतर्गत ट्रिगर्समुळे बाजारात तेजी दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. परकीय गुंतवणूकदारांचे कमबॅक झाल्याने बाजारात चांगले वातावरण होते. विकली एक्सपायरीच्या दिवशी अर्थात आज बाजारात काहीशी अस्थिरता असू शकते.

तांत्रिकदृष्ट्या बाजार सतत हायर हाय आणि हायर लो बनवत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये बाजारातील तेजी कायम राहण्याचा हा संकेत आहे. निफ्टीने दिली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे, आणि हे देखील शेअर बाजारातील तेजीचा वेग कायम राहण्याचे संकेत आहेत. पण निफ्टी 17,850 च्या खाली घसरल्यास इंट्राडेमध्ये झटपट सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि निफ्टी डाउनसाइडवर 17,700-17,680 च्या पातळीला स्पर्श करू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17,850 च्या वर राहण्यात यशस्वी झाला, तर तो 18,000 आणि नंतर 18,175 च्या दिशेने जाताना दिसू शकतो.

Pre Analysis Of Share Market
Share Market: आज शेअर बाजारात तेजी, Nifty 17,944 वर तर Sensex 418 अंकांनी वधारला

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

भारती एअरटेल (BHARTIARTL)

झी एंटरटेनमेंट लिमिटेड (ZEEL)

ट्रेंट (TRENT)

एल अँड टी (LTTS)

हिंदूस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

डिक्सन (DIXON)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com