Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market update

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

गुरुवारी शेअर बाजार सलग आठव्या दिवशी तेजीत राहिला. बाजाराने डिसेंबर महिन्याची सुरुवात तेजीने केली. सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा नवीन उच्चांक गाठला. यूएस फेडच्या कमी व्याजदर वाढीच्या अपेक्षेने बाजारात उत्साह दिसून आला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 184.54 अंकांनी म्हणजेच 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 63284.19 वर, तर निफ्टी 54.20 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 18812.50 वर बंद झाला. (pre analysis of share market update 2 December 2022 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

विकली एक्सपायरीच्या आधी बाजार अस्थिर व्यापारासह किंचित वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकींगचे अजित मिश्रा म्हणाले. गुरुवारी आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एनर्जी, ऑटो आणि एफएमसीजी दबावाखाली राहिले.

गुरुवारी हेवीवेट शेअर्सपेक्षा लहान आणि मध्यम शेअर्सनी चांगली कामगिरी केली. मिड आणि स्मॉल कॅपचा बाजारातील वाढता सहभाग हे चांगले लक्षण आहे. यावेळी शेअर बाजारातील प्रत्येक घसरणीवर खरेदीचे धोरण अवलंबावे असेही ते म्हणाले.

सध्याचे बाजाराचे स्ट्रक्चर ही तेजी कायम राहणार असल्याचे सूचित करत असल्याचे शेअर खानच्या गौरव रत्न पारखी यांनी सांगितले. शॉर्ट टर्ममध्येत निफ्टी 19000 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, निफ्टीला 18700 आणि 18600 सपोर्ट दिसत आहे

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
हिन्दाल्को (HINDALCO)
टाटा स्टील (TATASTEEL)
ग्रासिम (GRASIM)
टीसीएस (TCS)
एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
डिक्सन (DIXON)
व्होल्टास (VOLTAS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.