बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? |Pre Analysis Of Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market update

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

यूएस फेडकडून व्याजदरात मोठी वाढ होण्याच्या भीतीने गुंतवणूकदार चिंतेत दिसत आहेत. मंगळवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 497.73 अंकांनी म्हणजेच 0.89 टक्क्यांनी घसरून 55,268.49 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 147.15 अंकांनी म्हणजेच 0.88 टक्क्यांनी घसरून 16,483.85 वर बंद झाला.

हेही वाचा: Share Matket : शेअर बाजाराची सुरवात संथ गतीने; सेन्सेक्स हिरवा, निफ्टी लाल चिन्हावर उघडला

जगातील सर्व मोठ्या कंपन्या त्यांच्या कमाईच्या अंदाजात कपात करत आहेत, त्यामुळे जागतिक मंदीची भीती पुन्हा एकदा वाढल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. यूएस फेड आपल्या व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करू शकते. त्यामुळे पश्चिमेकडील बाजारांमध्ये मंदीची भीती वाढली आहे.

देशांतर्गत बाजारपेठ तुलनेने मजबूत असली तरी, पाश्चात्य बाजारांचा भारतीय बाजारांवरही परिणाम होईल असे वाटल असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार वधारला, Sensex मध्ये 615 अंकाची तेजी

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टी मंगळवारी दिवस संपण्यापूर्वी निफ्टी खाली घसरल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आवर्ली चार्टवर लोअर टॉप लोअर बॉटम फॉर्मेशन दिसत आहे, जे येत्या काळात कमकुवतपणाचे लक्षण आहे.

निफ्टी खाली 16400-16350 वर सपोर्ट आहे. जर तो खाली गेला तर निफ्टी 16000 पर्यंत जाऊ शकतो. वरच्या बाजूस, निफ्टीला 16600 वर रझिस्टंस आहे. निफ्टीने ही पातळी ओलांडल्यास तो आणखी वर जाईल.

निफ्टीने मंगळवारी डेली चार्टवर बियरीश कँडल तयार केली जी पुढे करेक्शन दाखवत आहे. व्यापार्‍यांसाठी 16600 वर रझिस्टंस आहे. जर निफ्टी खाली घसरला तर तो 16400-16350 च्या दिशेने जाताना दिसतो. दुसरीकडे, निफ्टीने 16600 ची पातळी ओलांडली तर आपण 16700-16735 च्या पातळीवर जाताना पाहू शकतो.

हेही वाचा: Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदार हवालदिल

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
ग्रासिम (GRASIM)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
पॉवरग्रीड (POWERGRID)
इन्फोसिस (INFY)
हिन्दुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
डॉ. रेड्डी (DRREDDY)
कोटक बँक (KOTAKBANK)

हेही वाचा: Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Pre Analysis Of Share Market Update 27 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..