प्राप्तिकर विवरणपत्र भरताना 'ही' काळजी घ्या

प्राप्तिकर विवरणपत्र भरताना 'ही' काळजी घ्या

नाशिक: प्राप्तिकर विभागाला खोट्या माहितीद्वारे परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी गंडविण्याच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल एक हजार 888 जण फसल्याचे पुढे आले. या सगळ्यांची फसवणूक करणारी एकच व्यक्ती असल्याचे सध्या समोर आले आहे. नाशिकमध्ये घडलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रासबंधित गैरव्यवहार प्रकरणात संगणक अभियंता असलेल्या किशोर राजेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीए असल्याचे भासवून लोकांना फसवणारा किशोर गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. आता पोलिसांनी स्वतंत्र पथक नेमले असून संशयित किशोर पाटील यांचा शोध घेतला जातो आहे. 

सनदी लेखापाल अर्थात सीए हे आर्थिक जगतातील विश्वासार्हता आणि गुणवत्तेचे प्रतीक म्हणून गौरविले जातात. मात्र  किशोर पाटील हा सनदी लेखापाल नसून त्याने सीए असल्याचे भासवत फसविले. मात्र पोलिसांनी  केलेल्या सखोल चौकशीनंतर व्यक्ती सीए नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरताना सामान्य नागरिकांनी 'सीए'च्या मार्गदर्शनाने भरणे हितकारक आहे.

प्राप्तिकर विभागाला खोट्या माहितीद्वारे परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी गंडविण्याच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल एक हजार 888 जण फसल्याचे पुढे आले. या सगळ्यांना फसवणूक करणारी एकच व्यक्ती असल्याचे दिसते. सूत्रधारापर्यंत कामगारांना पोचविण्यात ज्या कामगार पुढाऱ्यांचा हात होता, असे सगळे दलाल पुढारी नामानिराळे आहेत. त्यामुळे सूत्रधार शोधला; पण दलालांची टोळी कधी शोधणार, हा प्रश्‍न कायम आहे. 

करदात्यांनी काय काळजी घ्यावी? 
नागरिकांनी सनदी लेखापालांच्या मार्गदर्शनाने प्राप्तिकर विवरणपत्र भरले पाहिजे. फक्त सीए झालेली व्यक्ती प्राप्तिकर आणि इतर करांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे अपात्र व्यक्तींच्या सल्ल्याने किंवा मदतीने प्राप्तिकर विवरणपत्र भरू नये. जेणेकरून सामान्य नागरिकांची फसवणूक होणार नाही. सीए हे एक विश्वासार्हता आणि गुणवत्तेचे प्रतीक असतात. सीए हे जमा-खर्च, प्राप्तिकर, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), हिशेब तपासणी, भाग भांडवल उभारणीसाठी सल्ला, व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या सेवांमध्ये कार्यरत असतात. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com