
Prince Pipes Share : अडीच वर्षात सहा पट रिटर्न्स, येत्या काळात आणखी तेजीची शक्यता
Prince Pipes and Fittings Share : पॉलिमर पाईप्स आणि फिटिंग्जची आघाडीची कंपनी असलेल्या प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्जने अवघ्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना सहा पट परतावा दिला आहे. गुरुवारीही शेअर बाजाराच्या अस्थिर वातावरणात प्रिन्स पाईप्सचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते.
यामध्ये आणखी तेजीचा कल दिसून येत असल्याचे बाजार तज्ज्ञांनी म्हटले. हा स्टॉक 691 रुपयांवर जाऊ शकतो असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. सध्याच्या किमतीपेक्षा हे 19 टक्क्यांनी जास्त आहे. त्याच्या शेअर्सची किंमत सध्या 581.20 रुपये आहे.
प्रिन्स पाईप्सचे शेअर्स 30 डिसेंबर 2019 रोजी लिस्ट करण्यात आले होते, त्यावेळी ते 178 रुपयांच्या किंमतीला जारी करण्यात आले होते, पण हा शेअर 160 रुपयांच्या सवलतीवर लिस्ट झाला. त्यानंतर तो आणखी घसरला आणि 80 रुपयांच्याही खाली गेला पण नंतर पुन्हा तेजी आली. 22 मे 2020 रोजी त्याची किंमत 75.90 रुपये होती, जी आता 581.20 रुपये आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे भांडवल अवघ्या अडीच वर्षांत 666 टक्क्यांनी वाढले आहे.
हेही वाचा: Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
या वर्षी 17 जानेवारीला हा शेअर 748 रुपयांवर ट्रे़ड करत होता. पण यानंतर 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत तो 31 टक्क्यांनी घसरून 513.10 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर आला. पण आता पुन्हा यात खरेदीचा कल दिसत आहे आणि आतापर्यंत यात 13 टक्के वसुली झाली आहे.
हेही वाचा: Share Market Closing : आज बाजार तेजीसह बंद; बँकांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी
पीव्हीसीच्या किमती आता स्थिर झाल्यामुळे, डिसेंबरपासून पाईपची मागणी वाढू लागली आहे आणि आता प्रिन्स पाईप्सला चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत व्हॉल्यूम वाढ दुप्पट होण्याची आशा आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.