पगारातून महिन्याला 25 रुपये कापल्यानं मिळतो लाखो रुपयांचा फायदा; तुम्हाला माहिती आहे का?

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

अनेकदा असं दिसून येतं की, काही महिन्यापर्यंत वेलफेअर फंडात पैसे दिल्यानंतर मधेच सोडून दिले जाते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना याचा फायदा घेता येत नाही.

नवी दिल्ली - दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनातून काही रक्कम कापून घेण्यात आली तर ती कशासाठी घेतली जाते. यामुळे काय फायदा होतो याची माहिती कर्मचारी घेतात.  यातील काही रक्कम ही कर्मचाऱ्याला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देणारी असते. असाच एक फंडही आहे ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या महिन्याच्या पगारातून 25 रुपये कापून घेतले जाता आणि लाखो रुपयांच्या योजनेचा फायदा मिळू शकतो. 

'लेबर वेलफेअर फंड' असं त्याचं नाव असून ईएसआय आणि मेडिक्लेम यापेक्षा वेगळा राज्य लेबर वेलफेअर बोर्डाचा फंड आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना चश्मा, सायकल खरेदीपासून कृत्रिम अवयव प्रत्यारोपणापर्यंत पैसे मिळतात. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीसाठी सरकारकडून अनेक उपाय करण्यात आले आहेत.

यामध्ये अनेक योजनांचा समावेोश आहे. मात्र अनेक फंड असूनही कर्मचाऱ्यांना याची माहिती नसते. हरियाणात लेबर वेलफेअर फंडात खासगी कर्मचाऱ्यांकडून 25 रुपये दर महिन्याला कापून घेतले जातात. अनेकदा असं दिसून येतं की, काही महिन्यापर्यंत वेलफेअर फंडात पैसे दिल्यानंतर मधेच सोडून दिले जाते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना याचा फायदा घेता येत नाही. या फंडासाठी खूपच कमी रक्कम घेतली जाते मात्र फायदा जास्त होते.  देशातील ज्या राज्यांमध्ये लेबर वेलफेअर फंड आहे तिथं कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधासुद्दा एकसारख्याच आहेत. पगारातून कापून घेण्यात आलेल्या रकमेतही फारसा फरक नसतो. हरियाणात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लेबर वेलपेअर फंडांच्या फायद्याबद्दल सांगितलं जात आहे. 

वेलफेअर फंडातून मिळणारे फायदे
 

कन्यादान - कर्मचाऱ्याला मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये मिळतात. स्वत:च्या लग्नासाठीही मिळते रक्कम.

पर्यटन - चार वर्षातून एकदा चार लोकांच्या कुटुंबासाठी प्रवास खर्च दिला जातो. हे पैसे रेल्वेच्या दुसऱ्या श्रेणीतील तिकिटाचा असतो. दहा दिवसांच्या प्रवासासाठी देण्यात येतात. 

मुलांचे उच्च शिक्षण - कर्मचाऱ्यांच्या दोन मुलग्यांसाठी किंवा तीन मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पैसे मिळतात. नववी आणि दहावीसाठी चार हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत वर्षाला दिले जातात. मुलींना आठवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शाळेची पुस्तके, युनिफॉर्मसाठी वर्षाला पाच हजार रुपये दिले जातात. 

मुलांच्या शिकणीसाठी चार हजार रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत पैसे दिले जातात.  दोन मुले किंवा तीन मुली झाल्यास 7 हजार रुपयांपर्यंत धनराशी दिली जाते. 
कृत्रिम अवयव लावल्यास पूर्ण पैसे मिळतात. राज्यातील काही रुग्णालये यासाठी निवडण्यात आली आहेत. तर दिंव्याग झाल्यास 20 हजार रुपये मिळतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private employees can get labour welfare fund benefits benefits in only 25 rupees monthly salary deduction