PNB ग्राहकांना धक्का! 15 जानेवारीपासून 'या' सेवांसाठी वाढणार शुल्क

PNB ग्राहकांना धक्का! 15 जानेवारीपासून 'या' सेवेसाठी वाढणार शुल्क
pnb bank
pnb bank
Summary

पंजाब नॅशनल बॅंकेच्या (PNB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेच्या (Punjab National Bank - PNB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पंजाब नॅशनल बॅंकेचे ग्राहक असाल तर आता तुम्हाला बॅंकेच्या काही सेवांसाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. पीएनबीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो शहरांतील ग्राहकांच्या खात्यातील तिमाही किमान शिल्लक रकमेची मर्यादा सध्याच्या 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. (Punjab National Bank will charge extra service charges from January 15)

pnb bank
TATA अन्‌ Birla चे 'हे' दोन शेअर्स पाडताहेत नोटांचा पाऊस!

त्याचवेळी, ग्रामीण आणि निमशहरी भागात किमान शिल्लक न ठेवल्यास 200 रुपयांवरून 400 रुपये प्रति तिमाही शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरी आणि मेट्रो (Metro City) भागांसाठी ते 300 रुपयांवरून 600 रुपये करण्यात आले आहे. लक्षात घ्या की, हे शुल्क तिमाहीत आकारले जाईल. बॅंकेचे हे नवीन दर 15 जानेवारी 2022 पासून लागू होतील.

या सेवांसाठी आकारले जाईल अधिक शुल्क

एक्‍स्ट्रा लार्ज साईजचे लॉकर (Locker) वगळता सर्व क्षेत्रांसाठी आणि सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली आहे. शहरी आणि मेट्रो भागात लॉकर फीमध्ये 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी, एका वर्षात 15 विनामूल्य लॉकर व्हिजिटचे वेळापत्रक होते; त्यानंतर प्रत्येक व्हिजिटसाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात आले. 15 जानेवारीपासून मोफत लॉकर व्हिजिटची संख्या 12 करण्यात येईल, त्यानंतर ग्राहकांना प्रत्येक व्हिजिटसाठी 100 रुपये आकारले जातील.

pnb bank
स्टार्टअप्स देणार 20 लाख लोकांना रोजगार! असा आहे सरकारचा प्लॅन

हे शुल्कही वाढणार

नवीन दरानुसार, 1 फेब्रुवारीपासून डेबिट खात्यात पैसे नसल्यामुळे तुमचे कोणतेही हप्ते किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, त्यासाठी 250 रुपये भरावे लागतील. आतापर्यंत यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते. डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता तुम्हाला 150 रुपये द्यावे लागतील. यासाठी आता केवळ 100 रुपये आकारण्यात येत आहेत. PNB च्या वेबसाइटवर एका वेगळ्या अधिसूचनेत बॅंकेने म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी 2022 पासून, NACH डेबिटवर परतावा शुल्क 100 रुपये प्रति व्यवहाराऐवजी 250 रुपये प्रति व्यवहार असेल. म्हणजेच चेक रिटर्न झाल्यासही आता जास्त शुल्क आकारले जाणार आहे. 1 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या चेकवरील शुल्क 100 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आले आहे. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चेक रिटर्नसाठी 200 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही बॅंकेच्या शाखेत एका महिन्यात 3 वेळा बचत खात्यातून पैसे जमा केले तर ते विनामूल्य असेल, परंतु त्यापेक्षा जास्त रकमेसाठी तुम्हाला प्रति व्यवहार शुल्क 50 रुपये द्यावे लागतील. पूर्वी हे 25 रुपये होते आणि एका महिन्यात 5 वेळा विनामूल्य व्यवहार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com