गुंतवणुकीची संधी: 'रेल विकास निगम'चा आयपीओ 29 मार्च रोजी खुला होणार 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 March 2019

रेल विकास निगम लिमिटेड या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या  29 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

मुंबई: रेल विकास निगम लिमिटेड या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या  29 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांना आणि पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर 0.50 पैशांची सवलत देण्यात येणार आहे. रेल विकास निगम ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून रेल्वे मंत्रालयच्या अंतर्गत काम करते 

आयपीओच्या माध्यमातून 25 कोटी 34 लाख 57 हजार 280 शेअरची विक्री करण्यात येणार आहे.  गुंतवणूकदारांना किमान 780 शेअरसाठी आणि त्यानंतर 780 च्या पटीत अर्ज करणे आवश्यक आहे.  

आयपीओ म्हणजे काय?

व्यवसाय विस्ताराकरता कर्जे न घेता पैशांची उभारणी करण्यासाठी कंपन्या आपला आयपीओ म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) बाजारात आणत असतात. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी देतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rail Vikas Nigam to launch IPO, price band fixed at Rs 17-19 share