लवकरच लॉंच होणार स्टार हेल्थचा IPO! अधिक जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

star health ipo

तुम्हाला आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करायची असेल तर पुढच्याच आठवड्यात आणखी एक आयपीओ येत आहे. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ 30 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. शेअर मार्केट तज्ज्ञ राकेश झुनझुनवालांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

लवकरच लॉंच होणार स्टार हेल्थचा IPO! अधिक जाणून घ्या

Star Health IPO: शेअर मार्केटमधील दिग्गज राकेश झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ (IPO) पुढच्याच आठवड्यात 30 नोव्हेंबर रोजी येतो आहे. हा आयपीओ 2 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांसाठी, हा आयपीओ 29 नोव्हेंबर रोजी उघडू शकतो. या इश्यूमध्ये फ्रेश इक्विटी शेअर्सव्यतिरिक्त, ऑफर फॉर सेल (OFS) देखील असेल. तुम्हालाही या आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आधी त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत सुमारे 18.21 टक्के भागीदारी आहे.

आयपीओबद्दलची माहिती

स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये 2,000 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स असतील. त्याच वेळी, 5.83 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलही (OFS) असेल. सध्याचे शेअरहोल्डर्स ऑफर फॉर सेलद्वारे त्यांचे स्टेक कमी करतील.

हेही वाचा: आयटी, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्सना फटका! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

यापैकी 3.06 कोटी शेअर्स सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया (Safecrop Investments India) एलएलपीद्वारे विकले जातील. कोणार्क ट्रस्ट आणि एमएमपीएल ट्रस्टद्वारे 1,37,816 आणि 9,518 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल. एपीआयएस ग्रोथद्वारे (APIS Growth) सुमारे 6 76,80,371 इक्विटी शेअर्स विकले जातील, तर MIO IV स्टार आणि MIO स्टार या दोघांद्वारे 41,10,652 इक्विटी शेअर्स विकले जातील. युनिव्हर्सिटी ऑफ नोट्रे डेम डीयू एलएसीद्वारे (University of Notre Dame DU) 74,38,564 इक्विटी शेअर्स विकणार आहे. ROC Capital Pty Limited, वेंकटसामी जगन्नाथन, साई सतीश आणि बर्जिस मीनू देसाई हे देखील त्यांचे शेअर्स विकतील.

प्राइस बँड आणि लॉट साइज

स्टार हेल्थने त्यांच्या आयपीओसाठी 870-900 रुपये प्रति शेअर इतका प्राइस बँड निश्चित केला आहे. तर लॉट साइज 16 शेअर्सचा असेल. किमान एक लॉट खरेदी करणे आवश्यक आहे. 900 रुपयांवरच्या प्राइस बँडच्या बाबतीत, या इश्यूमध्ये किमान 14400 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यानंतर, 16 शेअर्सच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

हेही वाचा: SBI कडून शेअर्सवरही मिळते 20 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

बुक रनिंग लीड मॅनेजर

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेफ्रीट प्राइवेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अंबिट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर KFin Technologies Private Limited रजिस्ट्रार असतील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top