टाटांचा खास माणूस मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये रुजू !

 टाटांचा खास माणूस मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये रुजू !

मुंबई: उद्योग विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टाटा ट्रस्टचे माजी संचालक, रामचंद्रन वेंकटरामन मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले आहेत. गुरुवारी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पदभार सांभाळला आहे. कधीकाळी आर वेंकटरामन हे टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू लोकांपैकी एक समजले जात असत. मात्र फेब्रुवारी 2019 मध्ये वेंकटरामन यांनी टाटा ट्रस्टमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 

वेंकटरामन रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सामाजिक उपक्रम, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांची जबाबदारी सांभाळणार आहेत. 2017-18 आ आर्थिक वर्षामध्ये रिलायन्सने रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांवर 770 कोटी रुपये खर्च केले आहे. वेंकटरामन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सामाजिक उपक्रमांना मोठीच चालना देतील अशी अपेक्षा आहे. टाटा ट्रस्टसुद्धा आपल्या सामाजिक उपक्रमांसाठीच जगप्रसिद्ध आहे. याआधी रिलायन्स आणि टाटा समूहाने आपसातील स्पर्धा टाळण्यासाठी एकमेकांच्या कंपन्यांमधील अधिकाऱ्यांच्या किंवा संचालकांच्या नियुक्त्या थांबवल्या होत्या. सामाजिक उपक्रमांमध्येही दोन्ही समूह एकमेकांना सहकार्य करण्याचीच भूमिका घेत आहेत. 

वेंकटरामन टाटा ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग हे टाटा ट्रस्टचे कामकाज सांभाळत आहेत. वेंकटरामन टाटा ट्रस्टमध्ये पाच वर्ष कार्यरत होते. वेंकटरामन यांना टाटा ट्रस्टकडून 2.66 वार्षिक मानधन देण्यात येत होते. मात्र त्यांचे उत्पन्नावर प्राप्तिकराशी संबंधित प्रश्न उभे राहिले होते.  वेंकटरामन यांच्यावर एअरएशियातून पैशांचा गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणात सीबीआयकडून त्यांची चौकशी केली जाते आहे. एअरएशिया इंडिया ही टाटा आणि मलेशियाची विमानकंपनी एअरएशिया यांच्यातील संयुक्त कंपनी आहे. यामध्ये टाटांचा हिस्सा 51 टक्के तर एअरएशियाचा हिस्सा 49 टक्के इतका आहे. आपण मॅनेजिंग ट्रस्टीपदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असल्यामुळे राजीनामा देत असल्याचे वेंकटरामन यांनी टाटा ट्रस्टला दिलेल्या राजीनाम्यात म्हटले होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com