रिझर्व्ह बँकेकडून कर्जस्वस्ताईचा दिवाळी बोनस

कैलास रेडीज
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली. यामुळे रेपोदर 5.15 टक्के झाला आहे. यामुळे बँकांकडून कर्जदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली. यामुळे रेपोदर 5.15 टक्के झाला आहे. यामुळे बँकांकडून कर्जदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. सर्व बँकांना एक्स्टर्नल बेंचमार्कनुसार व्याजदर लागू करणे ऑक्टोबरपासून बंधनकारक केल्याने पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ऐन दिवाळीत ग्राहकांच्या पदरी पडणार आहे. यामुळे बाजारपेठेतील खरेदीला चालना मिळण्याची शक्यता असून मंदीच्या प्रभावात गुरफटून गेलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

 सलग पाच वेळा व्याजदर कपात करून रेपो दर 1.35 टक्‍क्‍याने कमी केला आहे.

रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता कर्जदर कमी झाल्याने गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची (MPC) बैठक मंगळवारपासून सुरु आहे.  बाजार विश्लेषक आणि  तज्ज्ञांकडून किमान पाव टक्का दर कपात होण्याची अपेक्षा आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. ही सलग पाचवी दर कपात करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI cuts repo rate by 25 bps to 5.15 pct lowest since March 2010