आरबीआयमध्ये पुन्हा राजीनामासत्र; विरल आचार्य यांनी सोडले पद

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर भविष्यात काय करणार याबाबत खुलासा केलेला नाही. त्यांचे कुटुंब अमेरिकेत असून, ते पुन्हा शिक्षण क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे. आचार्य यांनी याबाबतची माहिती आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि अर्थ मंत्रालयाला दिली आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) राजीनामा सत्र सुरुच असून, आता डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे.

विरल आचार्य यांचा डेप्युटी गर्व्हनर पदाचा कार्यकाळ 20 जानेवारी 2020 मध्ये संपणार होता. त्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. न्यूयॉर्कमधील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून ते थेट आरबीआयमध्ये नियुक्त झाले होते. आरबीआयचे माजी गर्व्हनर उर्जित पटेल यांचे ते निकटवर्तीय होते. आरबीआय आणि सरकारच्या वादात उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता.

आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर भविष्यात काय करणार याबाबत खुलासा केलेला नाही. त्यांचे कुटुंब अमेरिकेत असून, ते पुन्हा शिक्षण क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे. आचार्य यांनी याबाबतची माहिती आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि अर्थ मंत्रालयाला दिली आहे. गर्व्हनर आणि डेप्युटी गर्व्हनर यांची नियुक्ती थेट सरकारकडून केली जाते. चार डेप्युटी गर्व्हनर नेमले जातात, यातील दोघांनी नियुक्ती आरबीआय करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI deputy governor Viral Acharya quits six months before his term ends