cards
cardsgoogle

क्रेडीट आणि डेबिट कार्डची माहिती सुरक्षित करण्यासाठी RBIची मार्गदर्शक तत्त्वे

नव्या नियमांनुसार कार्डच्या संपूर्ण माहितीच्या ऐवजी एक सांकेतांक दिला जाणार आहे जो त्या कार्डपुरताच मर्यादित असेल.
Published on

मुंबई : क्रेडीट आणि डेबिट कार्डद्वारे होणारे व्यवहार १ जुलैपासून अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहेत. व्यावसायिक संकेतस्थळांना ३० जूननंतर ग्राहकांच्या कार्डचा क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक, एक्स्पायरी डेट, इत्यादी माहिती जतन करून ठेवता येणार नाही.

cards
Crypto currency : कूटचलनांची किंमत वधारली; बाजारात उत्साहाचे वातावरण

आरबीआयने गेल्या वर्षी debit and credit card tokenistion rules जाहीर केले होते. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी १ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार कार्डच्या संपूर्ण माहितीच्या ऐवजी एक सांकेतांक दिला जाणार आहे जो त्या कार्डपुरताच मर्यादित असेल.

आपल्या कार्डसाठी सांकेतांक निर्माण करणे हे मोफत असून अनिवार्य नाही. जर एखाद्या ग्राहकांना सांकेतांक निर्माण करण्याची परवानगी दिली नसल्यास त्याला कार्डची संपूर्ण माहिती भरावी लागेल.

कार्ड वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय एखाद्या चेक बॉक्स क्लिक करून किंवा स्वयंचलित पद्धतीने सांकेतांक निर्माण केला जाणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

सांकेतांक कसा निर्माण कराल ?

१. तुमच्या आवडीच्या संकेतस्थळावर जा आणि व्यवहार सुरू करा.

२. पेमेंट पद्धतीमध्ये क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा पर्याय निवडा. तेथे सीव्हीव्ही क्रमांक लिहा.

३. आता 'सिक्युअर युअर कार्ड' किंवा 'सेव्ह कार्ड्स अॅझ पर आरबीआय गाइडलाइन्स' या पर्यायावर क्लिक करा.

४. त्यानंतर सेव्हवर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी लिहा.

५. आता तुमचे कार्ड सुरक्षित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com