esakal | ATM मधून पैसे काढणं पडणार महागात; RBI लागू करणार नवा नियम
sakal

बोलून बातमी शोधा

RBI_ATM

बँक आणि एटीएम ऑपरेटर्सवरील देखभाल खर्चासह भागधारक आणि ग्राहकांच्या सोयी लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे, असं आरबीआयने म्हटलं आहे.

ATM मधून पैसे काढणं पडणार महागात; RBI लागू करणार नवा नियम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी (ता.१०) मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रोकड (Cash ATM Transaction) आणि नॉन-कॅश एटीएम ट्रान्झॅक्शन (Non-Cash ATM Transaction) वरील मोफत मर्यादा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन प्रणाली पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता यापुढे एटीएममधून पैसे काढण्याता तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. विनामूल्य मर्यादेनंतर एटीएम व्यवहारासाठी २१ रुपये शुल्क भरावे लागणार आहे, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. (RBI has increased fees charged on cash withdrawal from Rs 20 to Rs 21)

इंटरचेंज फीस म्हणजे काय?

कोणत्याही बँकेचा ग्राहक एटीएममधून दरमहा ५ विनामूल्य व्यवहार करू शकत होता. जर ए बँकेचा ग्राहक आपल्या कार्डचा वापर करून बी बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असेल, तर ए बँकेला बी बँकेला विशिष्ट फी द्यावी लागते. त्याला एटीएम इंटरचेंज फीस म्हणतात. अनेक वर्षांपासून खासगी बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर इंटरचेंज फी १५ रुपयांवरून १८ रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी करत होते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर विनामूल्य मर्यादेनंतर अन्य बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता ग्राहकांना फटका बसणार आहे. जून २०१९मध्ये भारतीय बँक असोसिएशनच्या मुख्य कार्यकारिणीच्या समितीच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: Tata Digitalची मोठी घोषणा, फार्मा ऍप 1MG मध्ये करणार गुंतवणूक

गेल्या वेळी एटीएम इंटरचेंज फीमध्ये बदल करण्यात आला होता, असे आरबीआयने म्हटले आहे. समितीच्या शिफारशींनंतर इंटरचेंज फी आणि कस्टमर चार्जेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक आणि एटीएम ऑपरेटर्सवरील देखभाल खर्चासह भागधारक आणि ग्राहकांच्या सोयी लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे, असं आरबीआयने म्हटलं आहे. केंद्रीय बँकेने वित्तीय आणि गैर-वित्तीय दोन्ही प्रकारच्या व्यवहारांसाठी इंटरचेंज फी वाढवली आहे. केंद्रीय बँकेने गैर-वित्तीय व्यवहारांसाठीचे शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपये केले आहे. जे १ ऑगस्ट २०२१ पासून लागू होईल. हा आदेश कॅश रिसायक्लर मशिनद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांनाही लागू असेल.

(Edited by : Ashish N. Kadam)

अर्थविश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.