RBI : होमलोन सहित इतर लोन महागणार? RBIचे पतधोरण आज होणार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

RBI : होमलोन सहित इतर लोन महागणार? RBIचे पतधोरण आज होणार जाहीर

नवी दिल्ली : गृहकर्जासोबतच इतर कर्जावरील व्याजदर वाढण्याती शक्यता आहे. त्यासंदर्भात आरबीआय आज नवे पतधोरण जाहीर करणार आहे. या पतधोरणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून यामध्ये व्याजदर वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर गेल्या सहा महिन्यात गृहकर्ज आणि इतर कर्जाचे व्याजदर जवळपास दीड टक्क्यांनी वाढले आहेत.

(RBI Latest Updates)

सध्याचा आरबीआयचा रेपो रेट हा ५.४० टक्के इतका असून आजच्या नव्या पतधोरणात रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे गृहकर्जासोबत सर्वच कर्जाचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. तर आज जाहीर होणाऱ्या पतधोरणाकडे सर्व अर्थजगताचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :loansRBI repo rate