esakal | रिझर्व्ह बँकेकडून 'जैसे थे'; रेपो दरात बदल नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Shaktikanta Das

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिझर्व्ह बँकेकडून 'जैसे थे'; रेपो दरात बदल नाही

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.15 टक्क्यांवर कायम राहणार आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्क्यांवर कायम आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिझर्व्ह बँकेकडून गेल्या पत धोरणात 0.35 टक्क्याची कपात करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.

रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता मात्र रेपो दरात कपात न केल्याने कर्जाच्या हप्त्यांमध्ये काहीही बदल होणार नाही.

गेल्या पतधोरणात रेपो दरात 0.35 टक्क्याची म्हणजेच 35 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. विकासाची मंदावलेली वाढ आणि एनबीएफसीमधील गैरव्यवहारांमुळे लिक्विडीटी घटल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपातीची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बँका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बँकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.