व्याजदरवाढीची टांगती तलवार

पीटीआय
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक कालपासून सुरू झाली. इंधनाचे भडकलेले दर आणि त्यामुळे चलनवाढीचा चढता आलेख याचा विचार करता व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याच्या शक्‍यता व्यक्त  होत आहे. 

पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी (ता. ५) संपत आहे. या बैठकीत व्याजदरवाढीचा निर्णय झाल्यास ही सलग तिसरी दरवाढ ठरेल. समितीने तब्बल साडेचार वर्षांनंतर जूनमधील द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीमध्ये व्याजदरात पाव टक्का वाढ केली होती. त्यानंतर ऑगस्टमधील बैठकीतही पाव टक्का वाढ करण्यात आली. यामुळे रेपो दर ६.५० टक्‍क्‍यांवर गेला आहे. 

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे वाढणारे भाव, रुपयाचे अवमूल्यन आणि चालू खात्यावरील वाढती तूट हे प्रमुख चिंतेचे मुद्दे समितीसमोर आहेत. व्याजदराचा विचार करताना समितीला या मुद्यांवरून गांभीर्याने विचार करावा लागेल. इंधनदरात वाढ होत असतानाही ऑगस्टमध्ये चलनवाढ कमी होऊन ३.६९ टक्‍क्‍यांवर आली आहे. जुलै महिन्यात चलनवाढ ४.१७ टक्के होती. आता चलनवाढीचा आलेख चढता राहण्याची दाट  शक्‍यता आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे. यामुळे चलनवाढ वाढेल. पतधोरण समिती यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलेल. रेपो दरात ०.२५ टक्का वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- राजकिरण राय जी., व्यवस्थापकीय संचालक, युनियन बॅंक ऑफ इंडिया 

सध्या रुपयाची इतर चलनांच्या तुलनेत मोठी घसरण झालेली आहे. रुपयाची नीचांकी पातळी पाहता व्याजदरात पाव टक्का वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. 
- केकी मिस्त्री, उपाध्यक्ष, एचडीएफसी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI rate setting panel begin meeting