बांधकाम क्षेत्राला रोकड टंचाईचे संकट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 August 2019

"फिच'चा इशारा; रोकड टंचाई कारणीभूत

मुंबई: बिगर बॅंकिंग वित्त सेवा क्षेत्राला (एनबीएफसी) समस्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे एनबीएफसी आणि हौसिंग फायनान्स कंपन्यांनी बांधकाम क्षेत्राला पत पुरवठा करताना हात आखडता घेतला असून, या पवित्र्यामुळे बांधकाम क्षेत्रात रोकड टंचाईची जोखीम वाढल्याचे "फिच रेटिंग्ज' या संस्थेने म्हटले आहे.

एनबीएफसी कंपन्यांवर पत पुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या विकासकांची रोकड टंचाईने कोंडी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदीशी झगडणाऱ्या या क्षेत्रामध्ये एनबीएफसी कंपन्यांनी जोखीम पत्करत मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला. मात्र, आता या कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. विकासकांकडे घरांचा प्रचंड शिल्लक साठा आहे. रखडलेल्या, महागड्या प्रकल्पांची निधीअभावी कोंडी झाली असून, विक्री ठप्प असल्याने विकसकांना निधी व्यवस्थापनात संघर्ष करावा लागत असल्याचे "फिच'ने स्पष्ट केले.

नव्या गुंतवणूकदारांची पाठ
आयएल अँड एफएस आणि दिवाण हौसिंग फायनान्स या दोन कंपन्या आर्थिक संकटात सापडल्यानंतर "एनबीएफसी' क्षेत्राला झटका बसला असून, यामुळे गुंतवणूकदार नव्याने एनबीएफसींमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे "फिच'ने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: REAL ESTATE SECTOR FACING PROBLEMS