Red Bull owner Death : 'रेड बुल'चे मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचं 78 व्या वर्षी निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Red Bull owner

Red Bull owner Death : 'रेड बुल'चे मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचं 78 व्या वर्षी निधन

एनर्जी ड्रिंक कंपनी रेड बुलचे सह-संस्थापक आणि रेड बुल फॉर्म्युला वन रेसिंग टीमचे संस्थापक आणि मालक ऑस्ट्रियन उद्योगपती डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एनर्जी ड्रिंक कंपनीची स्थापना ऑस्ट्रियन उद्योगपती मॅटेस्किट्झ यांनी 1984 मध्ये केली होती आणि एनर्जी ड्रिंक ब्रँडच्या 49% मालकी मॅटेस्किट्झ यांच्याकडे होती.

हेही वाचा: VIDEO : प्रवचन देताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका; लोक म्हणाले, असा मृत्यू करोडोंमध्ये एकालाच मिळतो!

मॅटेस्किट्झ यांचा 172 देशांमध्ये व्यवसाय होता.

ऑस्ट्रियन-थाई ग्रुप रेड बुलचा चेहरा म्हणून मॅटेस्किट्झ प्रसिद्ध होते. मॅटेस्किट्झ यांनी गेल्या वर्षी जगभरातील 172 देशांमध्ये त्यांच्या कॅफीन आणि टॉरिन-आधारित पेयांचे सुमारे 1,000 दशलक्ष कॅन विकले. मॅटेस्किट्झ यांनी केवळ एनर्जी ड्रिंकला जगभरात लोकप्रिय करण्यात मदत केली नाही, तर खेळ, मीडिया, तसेच रिअल इस्टेट आणि गॅस्ट्रोनॉमीचे साम्राज्य निर्माण केले होते.

रेड बुलच्या वाढत्या यशामुळे, त्यांनी खेळातील आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली. रेड बुल कंपनी आता फुटबॉल क्लब, आइस हॉकी संघ आणि रेसिंग संघ चालवते आणि विविध खेळांमध्ये शेकडो खेळाडूंसोबत करार करते.

टॅग्स :Businessdeath case