Reliance Petrol Pump : आता पेट्रोलचे दर होणार कमी? अंबानींनी इथेनॉल मिक्स पेट्रोल केले लाँच

इंडिया एनर्जी वीक दरम्यान, पीएम मोदींनी या आठवड्यात E-20 पेट्रोलची विक्री सुरू केली.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniSakal

Ethanol Blending Petrol : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि BP मोबिलिटी (BP मोबिलिटी) यांचा संयुक्त उपक्रम Jio-BP ने E20 पेट्रोलची विक्री सुरू करण्याची घोषणा केली.

या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण असते. हे पेट्रोल सध्या काही निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध असेल, असे दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाच्या वतीने सांगण्यात आले. इंडिया एनर्जी वीक दरम्यान, पीएम मोदींनी या आठवड्यात E-20 पेट्रोलची विक्री सुरू केली.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू :

पंतप्रधान मोदींनी हे पेट्रोल तिन्ही सरकारी पेट्रोलियम कंपन्यांसाठी सुरू केले. पण आता Jio-BP ने 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विक्रीची माहिती दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले की, E20 पेट्रोल बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. या E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स असेल.

Mukesh Ambani
Google Bard : एक चुकीचे उत्तर अन् गुगलचे 100 अब्ज डॉलर पाण्यात; वाचा काय आहे प्रकरण

इथेनॉल मिक्स पेट्रोल बाजारात दाखल :

जिओ-बीपी ही देशातील अशी पहिली खाजगी कंपनी आहे, जिने इथेनॉल मिक्स पेट्रोल बाजारात आणले आहे. आता हे पेट्रोल दिल्ली, मुंबईसह देशातील निवडक शहरांतील पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार आहे.

येत्या काळात इतर पेट्रोल पंपांवरही ते उपलब्ध करून देण्याची योजना आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होते.

कच्च्या तेलाचे बिल कमी करण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठी सरकार पेट्रोलच्या पर्यायावर सातत्याने काम करत आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

त्याअंतर्गत इथेनॉल मिक्स पेट्रोलची विक्री सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकारने ऊर्जा सुरक्षा, कमी कार्बन उत्सर्जन, उत्तम हवेचा दर्जा, स्वयंपूर्णता यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com