esakal | रिलायन्स इंडियाकडून REC Solar कंपनी 'टेकओव्हर'
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance Industries becomes 1st Indian company to cross Rs 9.5 lakh crore

रिलायन्स इंडियाकडून REC Solar कंपनी 'टेकओव्हर'

sakal_logo
By
ओमकार वाबळे

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने चीन नॅशनल ब्लूस्टर (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून आरईसी होल्डिंग्ज कंपनी 771 दशलक्ष डॉलर्सला टेकओव्हर करत असल्याची घोषणा केली. सन 2035 पर्यंत झीरो कार्बन इमिशनचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने जून महिन्यात यासंदर्भात घोषणा केली होती. जवळपास १०१ बिलियन युएस डॉलर्सची गुंतवणूक करण्याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर ही नॉर्वेजियन सौर पॅनेल निर्मात्याची कंपनी खरेदी करण्यात आली.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स 2030 पर्यंत किमान 100 गिगावॅट (GW)क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती बांधण्याची योजना आखत आहे. या दशकाच्या अखेरीस ही क्षमता 450 GW पर्यंत नेण्याच्या रिलायन्सचा मानस असल्याचे कंपनीने सांगितले.

सौर सेल्स आणि मॉड्यूल, ऊर्जा साठवण्याच्या बॅटरी, इंधन सेल्स आणि ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. यासाठी रिलायन्स समूहाचे चार "गिगा फॅक्टरीज्" उभारण्याचे लक्ष्य आहे.

loading image
go to top