रिलायन्सचा मुंबईला टाटा; पाच कार्यालये गुजरातला हलविली 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

मुंबई: देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातला हलविली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशीसंबंधित आहेत. तर, एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये मुंबई ऐवजी अहमदाबादला असतील. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्रातील संबंधित प्रशासकीय विभागाला देण्यात आली आहे. 

रिलायन्स जिओ मेसेजिंग सर्व्हिसेस लिमिटेड, रिलायन्स जियो इन्फ्राटेल प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि रिलायन्स जिओ डिजीटल सर्व्हिसेस लि. या रिलायन्स जिओशी संबंधित कंपन्या आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स आणि होल्डिंग्ज लिमिटेड (आरआयआयएचएल) ही रिलायन्सची गुंतवणूक कंपनी आहे. 

गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी 1960 मध्ये मुंबईत रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली होती. त्यानंतर देशभरात कंपनीचा विस्तार झाला आहे. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कंपनीचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. पेट्रोकेमिकल्स संबंधित सर्वात मोठी फॅक्टरी गुजरातमधील जामनगर येथे स्थित आहे. याशिवाय अनेक दुसरी कार्यालये गुजरातमध्ये आहेत. 

'जिओ' आणि 'रिटेल' शाखेच्या मदतीने रिलायन्स समूह रिटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात विस्तार करू पाहत आहे. गुजरातमधून सुरुवात केली जाणार असून याअंतर्गत छोट्या दुकानदार /गुंतवणूकदारांना रिलायन्सशी जोडण्याचा कंपनीचा मानस आहे. रिलायन्स उद्योग समूह ऑनालइन घाऊक बाजारपेठेत आल्याने डिजिटल रिटेल स्टोअर्सची संख्या आताच्या पंधरा हजारांवरून वाढून २०२३ पर्यंत पन्नास लाखांवर जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Industries moves registered offices of five subsidiaries to Gujarat