रिलायन्स जिओचे प्लान अपडेट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

प्रीपेडप्रमाणेच पोस्टपेड ग्राहकांसाठीही तीन नवे प्लान्स सादर करण्यात आलेत. रिलायन्स जिओच्या इतर प्लान्सचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राईम मेंबरशिप घेणे गरजेचे आहे. याशिवाय 309, 509, 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानही जिओकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुंबई - रिलायन्स जिओने प्रीपेड आणि पोस्टपेडचे प्लान नव्याने अपडेट केले आहेत. "धन धना धन' ऑफरमध्ये ग्राहकांना 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल आणि एक जीबी फोर जी डाटा प्रती दिवसांची सुविधा; तर 509 रुपयांच्या रिचार्जमध्ये हीच मर्यादा 2 जीबी सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय 149 रुपयांचा प्रीपेड प्लानही आहे. 

प्रीपेडधारकांसाठी सर्वात स्वस्त प्लान आहे अवघ्या 19 रुपयांचा आहे. एका दिवसासाठी व्हॅलिड असणारा या प्लानमध्ये प्राईम मेम्बर्सना अनलिमिटेड कॉलसोबतच 200 एमबी डाटा मिळेल. नॉन प्राईम मेंबरशिप असणाऱ्या केवळ 100 एमबी डाटा मिळेल. प्रीपेड ग्राहकांसाठी यानंतर 49 रुपये 3 दिवसांसाठी, 96 रुपये 7 दिवसांसाठी आणि 149 रुपये 28 दिवसांसाठी असेही प्लान्स सादर केले आहेत. 

प्रीपेडप्रमाणेच पोस्टपेड ग्राहकांसाठीही तीन नवे प्लान्स सादर करण्यात आलेत. रिलायन्स जिओच्या इतर प्लान्सचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राईम मेंबरशिप घेणे गरजेचे आहे. याशिवाय 309, 509, 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानही जिओकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Jio reworks its 4G data plans